Loading...

Bhagirathi

Home / Expression / Bhagirathi

मला आठवण येते न जेंव्हा तुझी खूप,
तेंव्हा मी इथे येतो…

मला माहित आहे
तू भेटणार नाहीस इथे .
कदाचित
तू भेटणार नाहीस आता कधीही
तरीसुद्धा …

ज्या शुद्ध पवित्र आणि सुंदर आंतरिक उर्जेने
आपण एकत्र आलो होतो ना
त्या उर्जेला परत मिळविण्यासाठी
थोडीशी का होईना ती अनुभूती परत घेण्यासाठी …

ती मिळाली की मग बाहेर शोधावं लागत नाही तुला
माझ्यातच सापडतेस तू …

Bhagirathi by Lalit Deshmukh
Bhagirathi by Lalit Deshmukh

Comments(0)

Leave a Comment