फोटो असा काढूत की…
फोटो असा काढूत की…
त्यातून …
गायकाच्या आवाजातले सूर त्यात उमटतील
अन नर्तकीच्या घुन्गरुंचे झंकार ऐकू येतील
प्राजक्ताच्या सड्यातील फुलांचा सुवास दरवळेल
फुलांचा मकरंद कधी तुमच्या ओठांवर उडेल
पानावरचा थेंब टपकन कधी डोळ्यावर पडेल
अन आश्चर्यातून आनंदाचा फुलोंरा फुलेल
काही दुखले तर हळुवार फुंकर तो घालेल
आनंदाच्या लहरी साता समुद्रापार पोचवेल
प्रेमाची तो कविता होईल तर कधी कवितेला सूर देईल.
हृदयाची धडधड वाढवेल तर कधी तिलाच अलगद शांत करेल.
बघा, सकाळच्या पिवळ्या उन्हाने तो उब आणेल का
खट्याळ खेळकर पावसाने तो ओलेचिंब करेल का
पहाटच्या किलबिलाटात एक शांत भैरव गाईल का
तर संध्येच्या रंगांसाठी कधी मारवा रंगवेल का
फोटो असा काढूत की …
तुमचा एक क्षण बघणाऱ्याचा अगदी स्वतःचा होईल
हरखतील, विसरतील, त्या क्षणात, कुणी पुरतेच हरवतील
शोधता शोधता त्यातच मग
कुणास ठावूक स्वतःलापण सापडवतील .